Wednesday, January 14, 2015

आपण आणि आपली तत्वं
याचं कुंपण घालून घेतलं न एकदा व्यवस्थित
की मग नाही वाटत एकटं
सरत जातात वर्षामागून वर्षे
टिकटिकत राहतो काटा...
आपल्याबरोबरीचे काही मागे पडतात, काही निघून जातात पुढे...
पण ते तसे असतातच की नेहमीच...
आपल्या आयुष्याच्या शर्यतीत आपण कायम मधोमध!
आपल्या आयुष्यातले आपणच तर असतो गणपती गुळाचे!
आपल्या आयुष्यात स्वतःच्या,
आपणच असतो की महत्वाचे,
की तत्वे आपली, 
चार भली चार बुरी,
यावरच तर ठरत की 
कुंपणात एकटे आहोत आपण
की कुंपणाची ही साथ आहे.