Tuesday, December 2, 2014

डर नहीं पर अँधेरा सा आता दिखता है,
और सहमीसी आँखे मेरे बच्चे की,
ये कौन से समय में जी रहे हैं हम,
जहाँ दस्तरख्वान सजा है कोक और बर्गरोंसे
पर आती रहती है उनमें से खुशबु,
सिर्फ बारूदों की और खून की
गहनो से लदे पड़े है हम,
पर उन पर भी जमीं है जैसे काई,
या राख काली काली
उड़कर जो आता है इराक, अफगानिस्तान पाकिस्तान से भी.
जिस जमीं पर कभी खेल है घर घर!
वो कभी हरी तो कभी गेरुआ बन जाती है,
बच्चों की किलकारियां भी
हवस की शिकार होती है,
लहू का आखरी बूँद
शरीर में बन जाता है पारा
और हाथ में आने से पहले ही
अपनी पहचान खो जाती है.
डर नहीं है फिर भी...
बास अँधेरा सा दिखता है
...मेरे बच्चे की आँखे सहमी सी है
© RASIKA AGASHE

Tuesday, September 2, 2014

हम दोनों 
ऐसे युग में रहते हैं
जिसकी गति हमारी सबकी गति से ज़्यादा है.
हमने भी प्यार किया
सदियोंसे चला आ रहा पाक़ प्रेम
पर हमारे साथ नहीं गूंजा हंसो का कलरव
न ही तुम्हे मुझमे एलोरा का सौंदर्य दिखा!
उत्तमपुरुष के नाप से मैंने भी कभी नापा नहीं तुम्हे.
 फिर भी हमने प्यार किया!
एक ऐसे युग में,
जहाँ हर चीज़ का मापदंड है, दूरी!
हम कितने दूर हैं.
दुनिया के तमाम लोग,जो प्यार करते हैं, किसी न किसी से
दूर हैं एक दूसरे से
इस तंत्र के महान युग में
जहाँ दुनिया छोटी होती जाती है, 
दिन ब दिन
हम तरसते रहते हैं
चिड़ियों की तरह घोंसला बनाने के लिए,
एक दूसरों पर भरोसा करने के लिए,
ये सुनने के लिए, के रिश्तों में तबादले नहीं होते
हम दोनों ऐसे युग में रहते हैं,
ये वाकई सच है!
©rasika agashe



Wednesday, August 13, 2014

मेरी आँखे खुली है
और नज़र साफ़
पर सबकुछ धुंधला दीखता है
रास्ते दूर तक फैले हुए
मंज़िल का एहसास भी है
पर धुंध बढाती जा रही
और अचानक ये महसूस होता है
ये धुंध नहीं है
भीड़ है
भयानक भीड़, बच्चोंकी
जो आ रहे हैं मेरी तरफ
कमर झुकाये, ग़र्दन टेढ़ी
खानेपीने का पता नहीं
पतली सींख से उनके शरीर
ये हे भविष्य
मेरा, हम सब का!
मेरी आँखे, अब भी खुली हुई
पर धुंध से थोड़ी गीली
ये आंसू पोछने के लिए
किससे कहूँ
हमारा भविष्य तो मुरझायासा
हमारी तरफ बढ़ रहा है!

Friday, July 11, 2014

कैसी अजीब सी रातें आती हैं

कैसी अजीब सी रातें आती हैं
जब लगता है नया दिन आएगा ही नहीं!
नहीं होना ख़ुद का इस दुनिया में,
ये तो ख़याल ए आम है ज़िन्दगी में.
पर इस दुनिया की ही ज़िन्दगी नहीं होगी कल
ये सोचना ख़ौफ़नाक फिर भी जायज़ है
ये साल, और पिछले कई साल ऐसे बीते
जहाँ लोगों ने महीने दर महीने ज़िन्दगी काटी
और अब औरतें गाज़ा की, तय करतीं सफर
ज़िन्दगी शायद कुछ घंटो की मानकर
और हम खुशगवार, मना रहें है ग़म का ख़त्म होना
मन ही मन करते इंतज़ार, सब कुछ ख़त्म होने का
महंगाई, भ्रष्टाचार, हिंसाचार, आरोप-प्रत्यारोप,
किसी क़ौम के, राज्य के, राष्ट्र के नागरिक होने का,
इंतज़ार रात ख़त्म होने का
...कैसी अजीब सी रातें आती हैं
©raskin 

Sunday, July 6, 2014

सब ऐसा ही चलता रहा तो...
हम कहाँ जा पहुचेंगे!
हम जो अपने आप को कहलाते ही
लोग ! इन्सान! और न जाने क्या क्या
कहाँ निकल पडे है हम
वैसे कहाँ के लिये चल पड़े  है हम
रास्ता...और ये अनगिनत सितारे..
खोज रहे हैं बेतरतीब से
पता नही क्या!
पेडो कि पत्तीयाँ गिरती रहती हैं ,
असमय
असमय हि सबकुछ पानी के तांडव में
डूबता नजर आता है
असमय!
ये शब्द हमारे समयो का है बस
वर्ना.. गहारते काले बदल, टुटती पहाड़ियाँ,
छोटे छोटे बच्चों कि असमय मृत्यू
के बावजुद..क्या हमारा चलना जरी राहता
...और ये सब ऐसा हि चलता रहा तो
...हम कहीं पहुचेंगे भी!


Thursday, June 26, 2014

हमारे समयों में ये कहानी कही जायेगी

हमारे समयों में ये कहानी कही जायेगी
एक कश्ती डूबतीसी , एक ना एक दिन
हवाओं में लहारायेगी
सुरज थम कर देखेगा
चिडिया उसे छू जायेगी
उसके गिले पंखोंसे,आयी रुलाई
वो छुपाए छुपा नाही पायेगा
पुरा शहर गीला गीला
ठंड में ठीठुरते रास्ते
भिखरन कि गोद में आस मुस्कुरायेगी
उसकी मिठी झुर्रीयोंमें
नीली गुलाबी नमी आयेगी
सोती हुई बच्ची कि कानोमें
वो कुछ तो कहेगी
हमारे समयोंमें यही कहानी कही जायेगी

Wednesday, June 25, 2014



पाऊस म्हजे ओलं धुकं

पाऊस म्हणजे कच्च्या गारा

पाऊस आता उलगडेल

मातीवरला पसारा




पाऊस म्हणजे सरासरी

पाऊस म्हणजे आकडेवारी

भिजता भिजता मरणाऱ्यांची

पाऊस सांगतो टक्केवारी




पाऊस म्हणजे ओले पक्षी

पाऊस म्हणजे खोट्या साक्षी

मागच्या कोरड्या हंगामाची

फाशीवारती उठते नक्षी




पाऊस कधी जास्त झाला

पाऊस कधी कमी झाला

तुझ्यामाझ्यासाठी बस

वाफाळलेला चहा निवला




पाऊस म्हणजे जगणं जगणं

पाऊस म्हणजे मरणं मरणं

माझ्या खिडकीतून तुझ्या शेतात

आता फक्त तुझ रूजणं.


Tuesday, June 24, 2014



ओली कविता कोरडी कविता
शब्दांमागून शब्द जात
होडीमधली डुले कविता

तू आर्त तू दग्ध
नवथर पालवीसारखी
हेलावणारी झुलवणारी कविता

खूप आतलं निळं निळं
स्वप्नंानाही ओलावणारी
नेणावणारी, फुलवणारी कविता

झुलवूनी  शब्दांचे झुले
रडता रडता हसवणारी
हसत हसत भिजवणारी कविता

थेंब थेंब तळ्यात मळ्यात
खेळणारी बागडणारी
कोवळी कोवळी जून कविता

माझ्या शांत अंगणात
विसावल्या कवडशांना
लपवणारी छपवणारी कविता


Monday, June 23, 2014


लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळून गेल्यासारखी रात्र...
जळून जात होती
रात्र वैर्याची होती
जागे रहा सांगायला नव्हता  कुणी जागा..
धर्म भिनतॊ अफूसारखा
धमन्यांमधून फिरत राहतो .
इवली कोवळी जळणारी पोरे
आपल्या जळक्या घराकडे पाहून
जळक्याच अंतःकरणांनी
जळते सूड घेत राहतात
लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळून गेल्यासारखी रात्र...
जळत राहते
उषःकाल  नसतो प्रसन्न
जळलेले सडलेले वास
नेत नसतो पाऊस
कितीही असला मुसळधार
जळणारी रात्र धुमसत राहते
जळणार्यांच्या  जाळणार्यांच्या  रक्तात
आणि त्याहूनही अधिक


दुरून बघणार्यांच्या डोळ्यात
आगीचे बंबच्या बंबही
विझवताना हरतात
लाल रंग आकाशात
रक्तासारखा उधळतात

कोपऱ्यातल्या बोळात
जळणारी टपरी
एकटी  स्वतः च शांत होते
नसतो तिच्यात कुठल्यात

"ईश्वराचा " अंश
फक्त तिला बसलाय
वास्तवाचा दंश

आता कसली यमक आणि कसले छंद
लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळताना
जळालेल्या रात्रीसारखे जळून गेलेले शब्द
आता फक़्त अस्थी
तुझ्या माझ्या वाटण्याच्या
रात्र वैर्याची आहे अन

जागे रहा सांगायला नाही  कुणी जागा..
Sent from my iPad

Monday, June 16, 2014

दुपारहून तू गेलास....

दुपारहून तू गेलास,
आणि संध्याकाळ आली,
आता हिचं काय करायचं!!!
वेड्यावेड्यासारखे वागायचे दिवस 
कापरासारखे उडुन गेलेत
पण
वय झाडासारखे नाही वाढत
एकाच दिशेने
कधी प्रगल्भतेचे झटके 
तर कधी सोळाव्याची तगमग ..
आणि अशात ती येते
संध्याकाळ!
पण तू तर दुपारहून गेलायेस
आता तिचं काय करायचं !!!
तुझ्या घट्ट मिठीतून
भिरभिरली हजारो फुलपाखर,
त्यांच्या रंगाना पकडताना चिमटीत
मिठी सैल करू नकोस!
मी हि पकडून ठेवलय घट्ट...
माझ्या मुठीत 
फुलपाखरू तुझ्या आकर्षणाच.
त्याची इवली तगमग
जाणवतीये माझ्या हाताला.
पण त्याला मारायचं धैर्य
नाही माझ्याकडे...
आणि त्याची ऊब हाताला
की ते सोडवत ही नाही

Thursday, June 12, 2014



फक्त रडणारे आपण

आपण, जे रडत बसतो , सतत...
वर्तमानपत्रातली दंग्यांची चित्रे  पाहून,
पूरग्रस्तांची वर्णने  ऐकून, वाचून...
बॉम्ब फुटतात, फुटतच राहतात!
आपण, जे रडत बसतो
कोण्या परिचिताच्या अभद्र मृत्युने,
अनोळखी शहरांच्या नरसंहाराने...
आपण, जे फक्त गप्पा मारतो
माणुसकीच्या दारूण मृत्युच्या
भावांनी भावाला विसरल्याच्या...
जगात घटना घडताच राहतात
आपण, ज्यांचे  जग दूर आहे अशा घटनांपासून,
वाईट नजरांपासून, आघातांपासून...आपलं नशीब आहे!
...रडत राहतो..
अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी
अन्यायाच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या  दूरदेशीच्या समाजासाठी...
किती पटकन लपवून टाकतो
आपले छोटे छोटे घाव
आपल्याच निष्काळजीपणामुळे
जखमा बनतात...कधीही न भरून येणाऱ्या  
आपण जे रडत बसतो....सतत !!