Thursday, June 12, 2014



फक्त रडणारे आपण

आपण, जे रडत बसतो , सतत...
वर्तमानपत्रातली दंग्यांची चित्रे  पाहून,
पूरग्रस्तांची वर्णने  ऐकून, वाचून...
बॉम्ब फुटतात, फुटतच राहतात!
आपण, जे रडत बसतो
कोण्या परिचिताच्या अभद्र मृत्युने,
अनोळखी शहरांच्या नरसंहाराने...
आपण, जे फक्त गप्पा मारतो
माणुसकीच्या दारूण मृत्युच्या
भावांनी भावाला विसरल्याच्या...
जगात घटना घडताच राहतात
आपण, ज्यांचे  जग दूर आहे अशा घटनांपासून,
वाईट नजरांपासून, आघातांपासून...आपलं नशीब आहे!
...रडत राहतो..
अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी
अन्यायाच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या  दूरदेशीच्या समाजासाठी...
किती पटकन लपवून टाकतो
आपले छोटे छोटे घाव
आपल्याच निष्काळजीपणामुळे
जखमा बनतात...कधीही न भरून येणाऱ्या  
आपण जे रडत बसतो....सतत !!

No comments:

Post a Comment