Wednesday, June 25, 2014



पाऊस म्हजे ओलं धुकं

पाऊस म्हणजे कच्च्या गारा

पाऊस आता उलगडेल

मातीवरला पसारा




पाऊस म्हणजे सरासरी

पाऊस म्हणजे आकडेवारी

भिजता भिजता मरणाऱ्यांची

पाऊस सांगतो टक्केवारी




पाऊस म्हणजे ओले पक्षी

पाऊस म्हणजे खोट्या साक्षी

मागच्या कोरड्या हंगामाची

फाशीवारती उठते नक्षी




पाऊस कधी जास्त झाला

पाऊस कधी कमी झाला

तुझ्यामाझ्यासाठी बस

वाफाळलेला चहा निवला




पाऊस म्हणजे जगणं जगणं

पाऊस म्हणजे मरणं मरणं

माझ्या खिडकीतून तुझ्या शेतात

आता फक्त तुझ रूजणं.


No comments:

Post a Comment