Monday, June 23, 2014


लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळून गेल्यासारखी रात्र...
जळून जात होती
रात्र वैर्याची होती
जागे रहा सांगायला नव्हता  कुणी जागा..
धर्म भिनतॊ अफूसारखा
धमन्यांमधून फिरत राहतो .
इवली कोवळी जळणारी पोरे
आपल्या जळक्या घराकडे पाहून
जळक्याच अंतःकरणांनी
जळते सूड घेत राहतात
लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळून गेल्यासारखी रात्र...
जळत राहते
उषःकाल  नसतो प्रसन्न
जळलेले सडलेले वास
नेत नसतो पाऊस
कितीही असला मुसळधार
जळणारी रात्र धुमसत राहते
जळणार्यांच्या  जाळणार्यांच्या  रक्तात
आणि त्याहूनही अधिक


दुरून बघणार्यांच्या डोळ्यात
आगीचे बंबच्या बंबही
विझवताना हरतात
लाल रंग आकाशात
रक्तासारखा उधळतात

कोपऱ्यातल्या बोळात
जळणारी टपरी
एकटी  स्वतः च शांत होते
नसतो तिच्यात कुठल्यात

"ईश्वराचा " अंश
फक्त तिला बसलाय
वास्तवाचा दंश

आता कसली यमक आणि कसले छंद
लक्ष लक्ष नक्षत्रांनी उजळताना
जळालेल्या रात्रीसारखे जळून गेलेले शब्द
आता फक़्त अस्थी
तुझ्या माझ्या वाटण्याच्या
रात्र वैर्याची आहे अन

जागे रहा सांगायला नाही  कुणी जागा..
Sent from my iPad

No comments:

Post a Comment