Friday, August 25, 2017


चल तर..

चल, तुला मनाच्या अशा प्रदेशात घेऊन जाते
जिथे चकव्याला रानभूल म्हणतात !
तुझ्या शारीर मोहोराचे दरवळ
अजून ताजे आहेत माझ्या मानेवर  !

चल, माझ्याबरोबर अशा आकाशात
जिथे उडण्यासाठी पंखांची घाई नाही रे !
तुझ्या बोटावर माझ्या नखांची नक्षी
क्षितिजभर वावटळ उठवत राहील !

चल माझ्या बरोबर गाढ संवेदनेच्या
त्या अवकाशात , जिथे प्रकाशाची विवरे आहेत
तुझ्या नजरेचा फास  पडलाय आत्म्याभोवती
आणि दुखावून सुखावणारा भोवरा तुझ्या तळहातावर..
तू फक्त चल..



No comments:

Post a Comment