Wednesday, January 24, 2018

जेंव्हा इमारती समोर उभ्या असतात
आ वासून तुम्हाला गिळंकृत  करण्यसाठी,
आणि तुम्हाला जाणवत  असतो ,
गुदमरणारा  श्वास  !
छोट्याशा  खिडकीतून  वाकून  बघणारे  
चड्डी  बनियान  आणि  ब्रा,
सांगत असतात  तीच  ती  गोष्ट , 
महानगराच्या  खुजेपणाची !
आणि  तुमच्या  बाल्कनी मधली 
तजेलदार  बोगनवेल  देत  असते,  
साक्ष  तुमच्या  सुखवस्तूपणाची .
पण  रोज  रोज  कॉफी  प्यायला 
बाल्कनीत  बसायला  वेळ उरलेला  नसतो.  
आणि  खरंतर  समोरच्या  
Sra च्या  बिल्डिंग  मधून 
वाकुल्या  दाखवणारे 
चड्डी  बनियान  आणि  ब्रा, 
न पुसून  टाकता  येणारा भूतकाळ,  
तुमच्या  मेकअपचं  कोरीव  काम  केलेल्या 
आणि  परफ्युमनी  न्हायलेल्या ,
नितळ  त्वचेला  देत  असतो  तडे  !

चड्डी  बनियान  आणि  ब्रा 
या  खासगी मालमत्तेचं 
प्रदर्शन  लावल्या  बद्दल 
‘त्यांच्यावर’  गुन्हा  दाखल  करता  येणार  नाही !
मग  शोधुयात  कारणं, 
लवकर  आणि  तत्परतेने 
‘त्यांना’  इथून  हद्दपार  करण्याची.  
गावाच्या  वेशीबाहेर  राहायची ज्यांची  लायकी  
ते  कसे  उगवलेत,  
पिंपळासारखे  आपल्याच 
सैनिटेरी  पाईप  च्या  आडोशाने 
त्याचा  घेऊ  या  शोध !
मग  घेऊ  बाल्कनीत 
कॉफी  .. 
समाजातल्या  अंतहीन  
दुही  बद्दल  चर्चा  करत 



No comments:

Post a Comment